कौटुंबिक न्यायालयात आता महिला वकिलांसाठी स्वतंत्र वकील कक्ष

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरातील जुने जिल्हा न्यायालयात सुरु असलेल्या कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या स्वतंत्र बार रूमचा शुभारंभ कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांच्या हस्ते झाला.

    यावेळी अहमदनगर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बऱ्हाटे, सेंट्रल बारचे अ‍ॅड सुभाष काकडे, वकील संघाच्या महिला सचिव अ‍ॅड. मीनाक्षी कराळे, केंद्र सरकारचे अ‍ॅड सुभाष भोर, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. शिवाजी कराळे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. सुनिल तोडकर, अ‍ॅड अनिता दिघे, अ‍ॅड अनुराधा येवले, अ‍ॅड. वृषाली तांदळे, अ‍ॅड. प्रज्ञा उजागरे, अ‍ॅड प्रज्ञा हेंद्रे, अ‍ॅड. पल्लवी पाटील, अ‍ॅड. राजेश कावरे, अ‍ॅड शेलोत, अ‍ॅड. सागर पादीर, अ‍ॅड अभय राजे, अ‍ॅड अरुणा राशीनकर, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक एस.बी. बिडवे उपस्थित होते.

    महिला वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम नसल्याने अनेक महिला वकिलांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात अहमदनगर बार असोसिएशनने न्यायालयाकडे महिला वकिलांसाठी स्वतंत्र वकील कक्ष मिळण्याची मागणी केली होती. यावर उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयांना नुकतेच कौटुंबिक न्यायालयात काम करणाऱ्या महिला वकीलांना स्वतंत्र वकील कक्ष मंजूर करण्यात आल्याचे पत्र दिलेले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा न्यायालयाने अहमदनगर बार असोसिएशनला सदरचे महिलांचे वकील कक्ष वापरण्यास परवानगी दिली आहे. महिला वकिलांना कौटुंबिक न्यायालयात काम करताना स्वतंत्र वकील कक्ष मिळाल्याने महिला वकीलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.