विहीरीत पडलेल्या हरणाला शेतकर्‍यांनी दिले जीवदान 

हरीण विहीरीत पडले  दृश्य पाहून या शेतकर्‍यांनी विहीरीच्या दिशेने धाव घेतली त्यानंतर शेतकर्‍यांनी  हरणाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले पण त्याच्या पायाला जखम झाली होती शेतकर्‍यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली त्यामुळे वनसेवक रोहिदास भोईटे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या हरणाच्या पायावर औषध उपचार करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

     संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांबुत बुद्रुक येथील एका चाळीस फुट खोल विहीरीत पडलेल्या हरणाला शेतकर्‍यांनी सुखरूप बाहेर काढत त्याला पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले आहे ही घटना शनिवार दिनांक १३ मार्च रोजी सकाळी घडली. याबाबत माहिती अशी की जांबुत बुद्रुक शिवारात यशवंत मेंगाळ,नामदेव मेंगाळ,नारायण मेंगाळ ,फारूक सय्यद या चौघा शेतकर्‍यांची एकत्रित विहीरी आहे शनिवारी सकाळी  सर्वजण विहीरी पासून काही अंतरावर होते त्याच वेळी हरीण विहीरीत पडले  दृश्य पाहून या शेतकर्‍यांनी विहीरीच्या दिशेने धाव घेतली त्यानंतर शेतकर्‍यांनी  हरणाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले पण त्याच्या पायाला जखम झाली होती शेतकर्‍यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली त्यामुळे वनसेवक रोहिदास भोईटे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या हरणाच्या पायावर औषध उपचार करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.