नवरदेवासाठी त्याचे मित्रच ठरले लग्नातील विघ्न, रिकाम्या हाती परतला नवरदेव, नेमकं काय घडलं? : जाणून घ्या सविस्तर

हमदनगर येथील एका घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. अनेक वेळा काही विचित्र कारणांमुळे मंडपातच लग्न तुटल्याच्या घटना आपण ऐकतो. असंच काहीसं या संबंधित घटनेमध्ये देखील घडलं आहे. कोरोना काळात चालू असलेल्या निर्बंधांमुळे अहमदनगर येथील एका तरुणाचा साखरपुडा आणि लग्न तसेच इतर विधी देखील एकाच दिवशी ठेवण्यात आले होते.

    अहमदनगर : अहमदनगर येथील एका घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. अनेक वेळा काही विचित्र कारणांमुळे मंडपातच लग्न तुटल्याच्या घटना आपण ऐकतो. असंच काहीसं या संबंधित घटनेमध्ये देखील घडलं आहे. कोरोना काळात चालू असलेल्या निर्बंधांमुळे अहमदनगर येथील एका तरुणाचा साखरपुडा आणि लग्न तसेच इतर विधी देखील एकाच दिवशी ठेवण्यात आले होते.

    नेमकं काय घडलं?

    दरम्यान यावेळी साखरपुडा झाल्यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला. साखरपुडा झाल्यानंतर हळदीची तयारी सुरु असताना नवरीने नवऱ्याचे मित्र बरोबर नसल्याचं कारण सांगून लग्नाला नकार दिला. नवरीचा निर्णय ऐकून मांडवातले सर्व नातेवाईक, पाहूणे चकीत झाले. अनेकांनी नवरीला समजवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र नवरी तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेर नवरदेवाला बिना नवरीचं घरी परतावं लागलं. संबंधित संपुर्ण घटना ही शुक्रवारी घडली असून ही घटना अहमदनगर येथील काष्टी येथील आहे.

    तसेच संबंधित नवरदेव हा श्रीगोंदा येथील रहिवासी आहे. वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनं काष्टी याठिकाणी एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र वराचे मित्र चांगले नाहीत असं कारण देत वधूनं चक्क लग्न मोडलं आणि सुखा दुःखात साथ देणारे मित्र तरुणासाठी विघ्न ठरले.