कर्जत नगरपंचायत वार्ड क्रमांक दोन मधून नितांत कचरे यांची उमेदवारी माजी मंत्री राम शिंदे यांनी केली जाहीर

कर्जत : कर्जत नगरपंचायतची मुदत संपून साधारण दोन महिने होऊन गेले असून सध्या नगरपंचायतवर प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असून साधारण फेब्रुवारी महिन्यात नगरपंचायतची निवडणूक जाहीर होईल असा अंदाज बांधून अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालक मंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी चांगल्या प्रकारे जोर लावल्याचे दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून कर्जत नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक दोन येथील नगरसेविका नीता अजिनाथ कचरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक दोन मधील सभामंडपाचे लोकार्पण केले.

कर्जत : कर्जत नगरपंचायतची मुदत संपून साधारण दोन महिने होऊन गेले असून सध्या नगरपंचायतवर प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असून साधारण फेब्रुवारी महिन्यात नगरपंचायतची निवडणूक जाहीर होईल असा अंदाज बांधून अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालक मंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी चांगल्या प्रकारे जोर लावल्याचे दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून कर्जत नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक दोन येथील नगरसेविका नीता अजिनाथ कचरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक दोन मधील सभामंडपाचे लोकार्पण केले. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की या प्रभागात नगरसेविका अनिता कचरे यांनी माझ्याकडून अनेक विकास कामांसाठी निधीची मागणी करून अनेक विकास कामे केली आहेत . यात प्रामुख्याने अंतर्गत डांबरी रस्ते, गटारी, कॉंक्रीट रस्ते, सभामंडप तसेच स्ट्रीट लाईटचे कामे व कर्जतवरून फिल्टर पाण्याची सोय सुद्धा या प्रभागातील नागरिकांसाठी नीता कचरे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत या प्रभागाच्या उमेदवार निता कचरेच असतील असे जाहीर सभेत राम शिंदे यांनी निता कचरे यांची उमेदवारी जाहीर केली. यावरूनच लक्षात येते की भारतीय जनता पक्षाने कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले की कर्जत नगरपंचायतला कर्जत शहरांमध्ये विकास कामांसाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आपण राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून दिला असून शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यावर आपण भर दिला. तसेच या प्रभागातील नगरसेविका नेता कचरे यांनी या प्रभागांमध्ये पाच वर्षात अतिशय चांगले काम केले असून त्यांच्या संपर्क कार्यालयात नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला असून त्यांनी या प्रयोगातील अनेक प्रश्न माझ्या कडून वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सोडवले आहेत. या वेळी बोलताना नामदेव राऊत म्हणाले की माजी मंत्री राम शिंदे यांच्या मदतीने व नगरपंचायतच्या माध्यमातून संपूर्ण कर्जत शहराचा विकास करण्यावर आपण भर दिला होता. पाच वर्षांपूर्वी असलेले कर्जत शहर व आज चे कर्जत यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणल्याचे दिसत आहे. याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त राम शिंदे यांना जाते. असे राऊत म्हणाले हे विकास कामे करताना पिढ्यान पिढ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही सोडला आहे. आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमस्वरूपी खाली उतरवण्याचे काम केले. या कार्यक्रमास नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे,आर. पी. आयचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत पाटील, काकासाहेब धांडे, स्वप्नील देसाई, नगरसेविका उषा राऊत, राणी गदादे, ज्योती शेळके, नगरसेविका हर्षदा काळदाते, आशा वाघ, अश्विनी दळवी, नगरसेविका वृषाली पाटील, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, कर्जत तालुका भाजपचे समन्वयक पप्पू शेठ धोदाड, आजिनाथ कचरे व प्रभागातील शेकडो नागरिक उपस्थित होते.