बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार; एक गंभीर जखमी, साकूर- जांबुत रोडवरील घटना

संगमनेर तालुक्यातील साकूर जांबुत बुद्रुक रोडवरील टावरे वस्ती येथील गुलाब बळवंत टावरे या शेतकर्‍याच्या चार शेळ्या बिबट्याने ठार केल्या असून एक शेळी गंभीर जखमी केली आहे ही घटना गुरूवार दिनांक १८ मार्च रोजी पहाटे घडली आहे.

    संगमनेर : संगमनेर तालुक्यातील साकूर जांबुत बुद्रुक रोडवरील टावरे वस्ती येथील गुलाब बळवंत टावरे या शेतकर्‍याच्या चार शेळ्या बिबट्याने ठार केल्या असून एक शेळी गंभीर जखमी केली आहे ही घटना गुरूवार दिनांक १८ मार्च रोजी पहाटे घडली आहे.

    याबाबत माहिती अशी की गुलाब टावरे हे शेतकरी  साकूर – जांबुत रोड पासून काही अंतरावरच असलेल्या  टावरे वस्ती येथे राहात आहे घरासमोरच त्यांची मोठी पत्र्याची शेड असून संरक्षण म्हणून पाच फुट लांब तारेची जाळीही आहे गुरूवारी पहाटे बरोबर बिबट्या तारेवरून उडी मारून आत मध्ये घुसला आणि चार शेळ्या जागीच ठार केल्या असून यामध्ये दोन लहाण बकरेही आहे तर एक शेळी गंभीर जखमी केली आहे

    सकाळी टावरे हे शेडकडे गेले असता तर समोर त्यांना शेळ्या मृत अवस्थेत दिसून आल्या त्यामुळे त्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली यापूर्वीही बिबट्याने याठिकाणी धुमाकूळ घातला होता त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने याठिकाणी  पिंजरा लावावा अशी मागणी गुलाब टावरे, प्रकाश टावरे, संजय चोपडा,बाळासाहेब रासणे, अशोक दिघे ,ज्ञानदेव दिघे,लक्ष्मण वाळुंज आदि शेतकर्‍यांनी केली आहे.