संगमनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी ५० लाखांचा निधी

राजापूर ते चिकणी रस्त्याच्या मजबुती करणासाठी निधी मंजूर
अहमदनगर:  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत असून जिल्हा परिषदेच्या निधीतून चिकणी, निम गाव भोजापूर ते राजापूर या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे मजबुतीकरण कामासाठी एकूण ५० लाख रुपयांच्या निधीच्या कामाचा शुभारंभ कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

चिकणी येथे जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून चिकणी ते निमगांव भोजापूर रस्त्ता(१०लाख), निमगाव भोजापूर ते राजापूर रस्ता(१० लाख) ना.थोरात यांचे निधीतून चिकणी ते हरिभाऊ वर्पे वस्ती (१५ लाख), जि.प. सदस्य निधी चिकणी ते उदयवर्पे वस्ती(१५ लाख)असे एकूण ५० लाख रुपये निधीतून होणार या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, कारखान्याचे उपा ध्यक्ष संतोष हासे,दूध संघाचे संचालक विलास वर्पे, सुनील कडलग, भारत वर्पे, आनंद वर्पे, प्रकाश कडलग, दत्तात्रय गुंजाळ, संजय वर्पे, चंद्रभान वर्पे, संदीप वर्पे, संतोष कडलग निमगाव भोजापूरच्या ग्रामसेविका नेहे, घुले आदी उपस्थित होते. इंद्रजीत थोरात म्हणाले की, तालुक्यात विकासकामांचा वेग कायम असून कोरोना संकट जरी असले तरी नामदार बाळासाहेब थोरात यांनी कायम गावच्या वाडी-वस्ती विकासाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी सर्वत्र तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. थोरात कारखान्याच्या मदतीने आढळाचे ओव्हरफ्लोचे पाणी रोहित सड्यात आणले आहे. यामुळे या परिसरात पाणी पातळी वाढणार आहे. तसेच या होणार्‍या रस्त्यांमुळे नागरिकांची सोय होणार आहे. यावेळी रामहरी कातोरे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात रस्त्यांचे व विद्युतीकरणाचे जाळे विणले गेले आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण प्राधान्य दिले जात असून जिल्हा परिषद ३०५४ निधीतून चिकणी, निमगाव भोजापूर ते राजापूर या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे मजबुतीकरण कामासाठी एकूण ५० लाख रुपयांच्या निधीच्या कामांमुळे नागरिकांना रस्त्याची मोठी सोय होणार असल्याचेही ते म्हणाले.