Gauri Gadakh death case Refusal of relatives to accept bodies; Demand for in-camera autopsy

वरिष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख  यांच्या सुनबाई, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय आणि सामाजिक नेते प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गौरी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिल्याने त्यांच्या मृत्युचे गूढ वाढले आहे.

अहमदनगर :  वरिष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख (yashwantrao gadakh)  यांच्या सुनबाई, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय आणि सामाजिक नेते प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख (gauri gadakh) यांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गौरी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिल्याने त्यांच्या मृत्युचे गूढ वाढले आहे.

गौरी गडाख यांच्या संशयित मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. रविवारी सकाळी गौरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद च्या घाटी रूग्णालयात (aurangabad ghati hospital) पाठविण्यात आला. नगरच्या जिल्हा रूग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करण्याचा निर्णय जिल्हा रूग्णालय प्रशासनाने घेतला.

गौरी गडाख यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी अहमदनगर मधील निवासस्थानी संशयित स्वरूपात आढळून आला होता. शनिवारी सायंकाळी  सातच्या सुमारास जवळच असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृतदेह नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

तोफखाना पोलीसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गौरी यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. गौरी गडाख या राहाता तालुक्यातील लोणी येथील वसंत विखे यांची मुलगी होत्या. माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील (radha krishna vikhe patil) यांच्या अतिशय जवळच्या नात्यातील हे कुटुंब आहे.