तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य कारणाऱ्या शिक्षकांचा गौरव

शिक्षक दिनानिमित्त रोटरी मिडटाऊन क्लबच्या वतीने तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्याशिक्षकांचा व क्लबचे सदस्य असलेल्या शिक्षकांचा नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड देवून सन्मान न्या.रेवती देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल प्रा.डॉ.दादासाहेब करंजुले, क्लबच्या सचिव आर्किटेक्ट कल्पना गांधी, माजी अध्यक्ष क्षितिज झावरे, लीत्रेसी डायरेक्टर अ‍ॅड.हेमंत कराळे यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.

  अहमदनगर : सध्याच्या काळात शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जात विद्यार्थ्यांना अवांतर गोष्टी शिकवाव्य लागत आहेत. त्यामुळे शिक्षकांचे काम हे खूप आव्हानात्मक होत चालले आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मित्र आहेत. आई-वडिलांना सांगत नाही अशा गोष्टी विद्यार्थी शिक्षकांशी शेअर करत असतात. त्यामुळे विद्याथ्यार्ची मानसिक परिस्थिती समजून घ्यावी. मुला मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार शिक्षक थोपोवू शकतात. अत्याचार बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी त्यांच्या मनात शिरावे. सातत्याने सामजिक बांधिलकी जपत मदतकार्य रोटरी क्लब करत आहे. रोटरी क्लबच्या या सामाजिक कायार्चे सर्वांनी अनुकरण करावे. तळागाळातील विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम रोटरी मिडटाऊन क्लबने राबवला आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त रोटरी मिडटाऊन क्लबच्या वतीने तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्याशिक्षकांचा व क्लबचे सदस्य असलेल्या शिक्षकांचा नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड देवून सन्मान न्या.रेवती देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल प्रा.डॉ.दादासाहेब करंजुले, क्लबच्या सचिव आर्किटेक्ट कल्पना गांधी, माजी अध्यक्ष क्षितिज झावरे, लीत्रेसी डायरेक्टर अ‍ॅड.हेमंत कराळे यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.

  प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे आयुष्यावर शिक्षकांप्रती मनात आदर असतो. तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य कारणाऱ्या शिक्षकांना नॅशनल बिल्डर अ‍ॅवार्ड देवून सन्मानीत करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. कोरोना मुळे मागील वर्षी हा सन्मान करता आला नाही. त्यामुळे यावर्षी दोन्ही वषार्चे पुरस्कार देत आहोत.

  - क्षितिज झावरे,माजी अध्यक्ष, रोटरी

  “शिक्षकांना सर्वत्र आदराचे स्थान आहे. समाजाचे शिक्षकांकडे लक्ष असल्याने सर्व शिक्षकांनी आपले वागणे, बोलेने, विचार सकारात्मक ठेवावे. रोटरी क्लबने दिलेला नॅशनल बिल्डर अ‍ॅवार्ड मिळाल्याने सर्व शिक्षकांची जवाबदारी वाढली आहे.”
  – डॉ.दादासाहेब करंजुले

  क्लबचे माजी सचिव अ‍ॅड.हेमंत कराळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमच्या आयोजनाची माहिती दिली. सचिव कल्पना गांधी यांनी आ•ाार मानले. शशी बिहाणी, विजय इंगळे, प्रदीप पांडे, डॉ.प्रकाश गरुड, किशोर डोंगरे, सतीश शिंगटे, उज्वला राजे, आर्किटेक्ट कन्हैय्या गांधी, डॉ.प्रसाद उबाळे, तुषार चोरडिया, वैशाली कराळे, अनिल बिहाणी, वर्षा पांडे, पद्मजा गरुड, सुजाता वाबळे, मधुरा झावरे, सविता देशमुख, सुजाता वाबळे, अनिता शिंगटे, श्रद्धा इंगळे, अमृता लबडे उपस्थित होते.