Sai Baba's Darshan of Shirdi will be available only if there is online booking; Sai Sansthan's appeal to come to Shirdi only if there is a booking

शिर्डी : दिवाळीनंतर धार्मिक स्थळांवरील बंदी हटवण्यात आली. यानंतर शिर्डीतील साई मंदिरही खुले करण्यात आले. भाविक मोठ्या संख्येने साई दर्शनासाठी शिर्डीला जात आहेत. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीसाठी खास ट्रेन सुरु करण्याची घोषणा मध्य रेल्वेने घेतली आहे.

दक्षिण भारतातील भाविकांचा शिर्डीकडील ओढा लक्षात घेता द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस, शिर्डी-सिकंदराबाद-शिर्डी व काकिनाडा-शिर्डी या तीन विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

श्री साईनगर शिर्डी द्विसाप्ताहिक विशेष गाडी ४ डिसेंबरपासून सिकंदराबादहून दर शुक्रवार, रविवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल. विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसोल मार्गे शिर्डीला सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. शिर्डी-सिकंदराबाद ही विशेष गाडी ५ डिसेंबरला शिर्डीहून दर शनिवारी व सोमवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. औरंगाबाद, परभणी, परळी, उदगीर मार्गे सिकंदराबादला सकाळी ८.५५ वाजता पोहोचेल.

काकिनाडा- शिर्डीही विशेष रेल्वे काकिनाडाहून ५ डिसेंबरपासून दर सोमवारी बुधवार, शनिवारी सकाळी ६ वाजता सुटेल. राजमुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबादमार्गे शिर्डीला सकाळी ०९.१० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात शिर्डी-काकिनाडा ही विशेष गाडी शिर्डीहून ६ डिसेंबरपासून दर मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ती औरंगाबाद, परभणी, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे काकिनाडा येथे रात्री ७.४५ वा. पोहोचणार आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशातील सर्व धार्मिक स्थळांवर बंदी घातली होती. अनलॉकच्या प्रक्रियेत ही बंदी हटवण्यात आली आहे. यानंतर सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली झाली आहेत.