Governor has no right to remain on post says Arjun Khotkar
राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही : अर्जुन खोतकर

राज्यपाल (governor) हे घटनात्मक पद आहे, परंतु महाराष्ट्राच्या (maharashtra) राज्यपालांनी घटना पायदळी तुडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केली आहे.

अहमदनगर: राज्यपाल (governor) हे घटनात्मक पद आहे, परंतु महाराष्ट्राच्या (maharashtra) राज्यपालांनी घटना पायदळी तुडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केली आहे. दरम्यान, मंदिर उघडण्यावरून (temples opens) भाजप (bjp) राजकारण (politics) करत असून, केवळ भावना भडकावण्याचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले.

अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नगर येथे आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा युवा अधिकारी विक्रम राठोड, संजय शेंडगे, संभाजी कदम, नगरसेवक भाऊ बोरुडे, मदन आढाव आदी यावेळी उपस्थित होते.

खोतकर म्हणाले, मी ३५ वर्षांपासून विधिमंडळ कामकाजात आहे; परंतु राज्यपालांनी अशी भूमिका घेतल्याचे आठवत नाही. त्यामुळे सध्याच्या राज्यपालांना संविधान मान्य नाही का? असा प्रश्न पडतो. राज्यपालपदाच्या खुर्चीवर बसून जातिवाद करणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी या पदावर राहणे संयुक्तिक नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे राज्याचा कारभार करीत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी त्यांनी काळजी घेतली आहे. मात्र, भाजप यात द्वेषपूर्ण राजकारण करीत आहे. त्यात आता घटनादत्त पद असलेले राज्यपाल संविधान पायदळी तुडविण्याचे काम करत आहेत.