राज्यपालांनी लोकशाहीची बुज राखावी; जयंत पाटील यांची राज्यपाल भगतहसिंह कोश्यारींवर टीका 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतहसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. सरकारने विधानपरिषदेसाठी बारा नावे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव घेऊन राज्यपालांकडे पाठवली आहे.

    नगर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतहसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. सरकारने विधानपरिषदेसाठी बारा नावे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव घेऊन राज्यपालांकडे पाठवली आहे.

    मात्र, अनेकदिवस उलटले तरी राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिलेली नाही, असे पाटील म्हणाले. उच्च न्यायालयाने याबाबत विचारणा केली आहे. तर माहिती अधिकारात ही नावे राज्यपालांकडे पोहचली नाहीत, असे सांगण्यात येत आहेत.

    याबद्दल पाटील यांना विचारले असता, हा देश बाबासाहेबांनी लिहलेल्या घटनेवर चालतो. लोकशाही पद्धतीने सत्तेवर आलेले हे सरकार आहे. या परस्थितीत लोकशाहीची बुज राखली गेली पाहिजे, दुर्दैवाने सध्या ते दिसत नसल्याचे पाटील म्हणाले.