Gudi erected by MP at Kovid Center; Padva festival celebrated with patients

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सर्वत्र साधेपणाने साजरा केला जात असताना नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र थेट कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन तेथील रुग्णांसोबत सण साजरा केला. शिर्डीतील कोविड केअर सेंटरमध्ये त्यांनी गुढी उभारली तसेच तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणही वाढले. करोनामुळे घरापासून दूर राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी आपण येथे आल्याचे विखे पाटील सांगितले.

    अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सर्वत्र साधेपणाने साजरा केला जात असताना नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र थेट कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन तेथील रुग्णांसोबत सण साजरा केला. शिर्डीतील कोविड केअर सेंटरमध्ये त्यांनी गुढी उभारली तसेच तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणही वाढले. करोनामुळे घरापासून दूर राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी आपण येथे आल्याचे विखे पाटील सांगितले.

    पीपीई कीटचा वापर

    खासदार विखे पाटील यांनी शिर्डीतील कोविड रुग्णालयास भेट दिली. तेथे त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी पीपीई कीट घालून डॉक्टर व अन्य अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. उपचार घेणाऱ्या रुग्णांना विखे यांच्या हस्ते जेवण वाटप करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मनावर या संकटाची भीती कायम आहे. पारंपरिक सण असूनही कुटुंबीयांसमवेत साजरा करता येवू शकत नाही. त्यांचे हे दु:ख हलके करण्यासाठी आपण येथे आल्याचे विखे यांनी सांगितले.

    रुग्णांना दिला दिलासा

    करोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटरमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या. बेडची व्यवस्था ऑक्सिजन सुविधा आणि आवश्यक असणारी उपचाराची साधन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने डॉ. विखे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यांनी बराच काळ अधिकारी आणि तेथील रूग्णांसोबत घालवून त्यांना दिलासा दिला.