शिर्डीत भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ ; साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस साजरी होणार गुरुपौर्णिमा

आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ५.०० वाजता श्रींच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी विणा, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी तर मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला.

  साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा  उत्सवाला आज पासुन सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने यंदाच्या वर्षीही भाविकांना विना गुरूपौर्णिमा उत्सव साई मंदिराचा आतच साई संस्थानकडुन साजरा करण्यात येत आहे.

  आज सकाळच्या काकड आरतीनंतर साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरित ग्रंथांची मिरवणूक साई मंदिरापासून ते साईंच्या व्दारकामाई मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर व्दारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन मिरवणुकीला गुरूस्थान मंदिराच्या मार्ग समाधी मंदिरात आणण्यात आले. आणि तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे.

  आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ५.०० वाजता श्रींच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी विणा, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी तर मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, सरंक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी व मंदिर पुजारी उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी प्रथम अध्याय, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी व्दितीय अध्याय, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी तृतीय अध्याय, कार्यकारी अभियंता संजय जोरी यांनी चौथा अध्याय व संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.

  उत्सवाच्या पहील्या दिवशी सकाळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.संगिता बगाटे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती झाली. सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे कीर्तन झाले. सायं.०७.०० वाजता श्रींची धुपारती व रात्रौ १०.३० वाजता शेजारती करण्‍यात आली. तसेच श्री साईसच्चरित पारायाणासाठी व्दारकामाई मंदीर आतील बाजुने रात्रभर खुले ठेवण्‍यात आले होते

  यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती शुभा पाई यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व सुनिल बाराहाते, साई समर्थ इलेक्‍ट्रीकल, शिर्डी यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली.उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी शुक्रवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० वाजता अखंड पारायण पारायण समाप्तीनिमित्‍त श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

  साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या काना-कोपऱ्यातून लाखो भक्त येत असतात तसेच पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल होत असतात मात्र गेल्या वर्षाभरा पासुन देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने यदांचा वर्षीही भाविकांना विना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतोय जिल्ह्या अंतर्गत प्रवासास बंदी नसल्याने काही प्रमाणात भाविक शिर्डीत येवुन साईबाबांच्या कळसाच दर्शन घेतायेत आज गुरुवार उत्सवाच पहीला दिवस एरवी गुरुवारी आणि उत्सवाच्या दिवशी प्रचंड गर्दी होत असते मात्र करोणा मुळे ही गर्दीच झाली नाही.