राहुरीत धुव्वाधार पाऊस! दुकानांत पाणी घुसले, बांध फुटले ; मुळा धरण वीस हजारी पार

सोमवारी रात्री राहुरी शहरात तब्बल तीन तास जोरदार पाऊस कोसळत होता . मध्यरात्री झालेल्या या पावसाने शनि चौक व मल्हारवाडी रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरले. राहुरी शहरात ७० मिलिमीटर पावसाची पडल्याचीनोंद झली आहे. तालुक्यातील मुळानगर येथे सर्वाधिक ७६ मिलिमीटर तर मुसळवाडी १८ , देवळाली प्रवरा १६ , सोनगाव १३ , वांबोरी २४ मिलिमीटर पाऊस झाला.

    राहुरी : सोमवारी रात्री राहुरी शहरात झालेल्या दमदार पावसाने अनेक व्यवसायिकांच्या दुकानात पाणी शिरले.शेतीचे बांध फुटले. या पावसाने मुळा धरणात पाऊण टीएमसी पाण्याची नव्याने आवक होऊन धरण साठा वीस हजारापुढे सरकला आहे. तालुक्‍यातील अनेक भागात सोमवारी रात्री पूर्वा नक्षत्राच्या पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली. श्रावण महिन्यात म्हणावा असा पाउस झाला नव्हता. रात्री झालेल्या पावसाने संगळीकडे पाणीच पाणी झाले. आज मंगळवारी देखील दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.

    सोमवारी रात्री राहुरी शहरात तब्बल तीन तास जोरदार पाऊस कोसळत होता . मध्यरात्री झालेल्या या पावसाने शनि चौक व मल्हारवाडी रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरले. राहुरी शहरात ७० मिलिमीटर पावसाची पडल्याचीनोंद झली आहे. तालुक्यातील मुळानगर येथे सर्वाधिक ७६ मिलिमीटर तर मुसळवाडी १८ , देवळाली प्रवरा १६ , सोनगाव १३ , वांबोरी २४ मिलिमीटर पाऊस झाला.

    मुळा नगर येथे धरणक्षेत्रात रात्री झालेल्या पावसामुळे धरणात ( पाऊण टीएमसी ) ६९६ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होत धरण साठा २० हजार २०३ दशलक्ष घनफूटवर पोहोचला आहे . कोतुळ येथे ४५ मिलिमीटर पाऊस नोंद झाला तर पाण्याची आवक ७०० क्यूसेक्सने सुरू होती.