नगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी, वस्तू गेल्या वाहून…

नगरमध्ये जोरदार पाऊस झाला असून मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच येथील वस्तू पाण्यातून वाहून जात आहेत.

 नगर : राज्यात १ जूनपासून (June)  पावसाचे आगमन झाले. तसेच जून आणि जुलै (July) महिन्यात राज्यात कमी आणि अधिक प्रमाणात पाऊस झाला. राज्यात ३ सप्टेंबरपासून ते ६ सप्टेंबरपर्यंत (September) मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल ३ सप्टेंबर रोजी नगरमध्ये (Heavy rains in the Nagar) जोरदार पाऊस झाला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून येथील वस्तू (Carrying Goods) पाण्यातून वाहून जात आहेत.

या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की, नगरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच या रस्त्यावरील वाहत्या पाण्यात दुचाकी वाहन आणि काही ड्रम वाहून जाताना दिसत आहेत.

या वाहत्या पाण्यात दुचाकी वाहत असताना एका व्यक्तीने दुचाकीला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान,काल गुरूवारी राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज  हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.