Heavy rains with thunderstorms in Ahmednagar and Nashik; Vehicles, markets submerged

अहमदनगर आणि नाशिकमध्ये विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला आहे( Heavy rains with thunderstorms in Ahmednagar and Nashik). नगर शहर पाथर्डी,नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस कोसळला. वाहने, बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या.

    नाशिक : अहमदनगरमध्ये विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला आहे( Heavy rains with thunderstorms in Ahmednagar and Nashik). नगर शहर पाथर्डी,नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस कोसळला. वाहने, बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या.

    अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीतील आनंदी बाजार परिसरात पावसाच्या पाण्यात दुचाकी-चारचाकी वाहने बुडाली. तीन वाजता पावसाला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासात धुवाधार पावसाने नगर शहरात पाणीच पाणी झाले.

    महापालिकेच्या गटारी साफ केल्याचा दावा या पावसाने धुवून काढला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून अनेक रस्त्यांना नाल्याचे रूप आले. शहरासह जिल्ह्याच्या सर्वदूर भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सोयाबीनची पिकेही पाण्याखाली गेले आहेत. कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

    अहमदनगरमध्ये विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस