If the farmers' issues are not resolved, they will go on hunger strike again Letter written by Anna Hazare to Modi Government

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर मी उपोषणाला बसणार. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सुरु असलेलं हे आंदोलन देशव्यापी झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता त्यांनी थेट उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. ‘हे आंदोलन केव्हा, कसे व कोठे केले जाईल, याचा तपशील लवकरच जाहीर करू,’ असे अण्णांनी पत्रात नमूद केले आहे.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना एक पत्र पाठवले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसणार असा इशाराच अण्णांनी या पत्राद्वारे मोदी सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर मी उपोषणाला बसणार. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सुरु असलेलं हे आंदोलन देशव्यापी झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता त्यांनी थेट उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. ‘हे आंदोलन केव्हा, कसे व कोठे केले जाईल, याचा तपशील लवकरच जाहीर करू,’ असे अण्णांनी पत्रात नमूद केले आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबरला भारत बंद पाळण्यात आला होता. त्यामध्ये हजारे यांनी सक्रिय सहभाग घेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. पत्रात त्यांनी पूर्वीच्या कृषी मंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात अण्णांनी आंदोलनात केलेल्या मागण्या आणि त्यावर सरकारने दिलेली आश्वासने यांचाच उल्लेख केला आहे.