वेतना अभावी उपासमारीची वेळ आलेल्या एस टी कर्मचार्‍यांचे वेतनासाठी अमरण उपोषण

कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा मानस यावेळी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  माहे जून जुलै महिन्यातील स्पेअर दिवसाच्या हजारी च्या दिवसाची वेतन पुरवणी पगार पत्रिका मिळून वेतन अदा करण्यात यावे.

    अहमदनगर: करोना काळात कामगिरी न मिळाल्यामुळे वेतना अभावी उपासमारीची वेळ एसटी कर्मचारी वर आल्याने कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आठ वाजता शेवगाव आगारामध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे, हे उपोषण महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे सचिव दिलीप लबडे व सेक्रेटरी राजेंद्र घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे.

    यावेळी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा मानस यावेळी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. माहे जून जुलै महिन्यातील स्पेअर दिवसाच्या हजारी च्या दिवसाची वेतन पुरवणी पगार पत्रिका मिळून वेतन अदा करण्यात यावे, वाहतूक नियंत्रक चक्री अलोकेशनची अंमलबजावणी करण्यात यावी, ३१ ऑगस्ट रोजी शेवगाव पाथर्डी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्या मुळे सर्वच मार्ग बंद झाले होते सदर दिवसांची हजरी आगारातील कामगारांना देण्यात यावी.  मालवाहतूक भत्ता व आठवडा सुट्टीचा मोबदला ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन अदा करण्यात यावे.

    कोरोना कालावधीत काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहनपर भत्ता तीनशे रुपये रोज प्रमाणे पेड इन सप्टेंबरच्या पगारात देण्यात यावा, वरील प्रश्नांची सोडवणूक करून कर्मचाऱ्यांना स्पेअर दिवसाच्या हजरीचे वेतन न दिल्यामुळे कामगारांना एसटी को ऑफ बॅंकेच्या घेतलेल्या कर्जाच्या व्याजात झालेल्या वाढीच्या रकमेची जबाबदारी निश्चित करून या रकमेचे वाटप कामगारांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर च्या वेतनात अदा करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी आज शेवगाव आगारांमध्ये उपोषणास बसलेले आहेत.

    परिवहन मंत्री, उपाध्यक्ष तथा महाव्यवस्थापक राज्य परिवहन, महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबई, जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस अधिक्षक अहमदनगर, विभाग नियंत्रक अहमदनगर, केंद्रीय अध्यक्ष सचिव मान्यताप्राप्त, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना मध्यवर्ती कार्यालय मुंबई, शेवगाव तहसीलदार, शेवगाव पोलीस उपनिरीक्षक यांना  या आशियाच्या प्रति देण्यात आल्या आहेत,