accused Vikram Murmade
हाच तो माथेफिरू तरुण विक्रम रमेश मुसमाडे

  • तरुणाही स्वतःवर गोळीबार
  • कट्ट्यातून सुटलेली गोळी तरूणीच्या डोक्याला चाटून गेली

अहमदनगर (Ahamadnagar). जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात प्रेमप्रकरणातुन एका तरुणाने तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत स्वतःवर देखील गोळी झाडुन आत्महत्या चा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडालीय. यात सदर तरूणी बचावली असुन तरूणाची प्रकृती माञ चिंताजनक आहे.

देवळाली प्रवरा गावात एकतर्फी प्रेमातून विक्रम रमेश मुसमाडे या ३० वर्षीय तरूणाने गावातीलच २५ तरुणीच्या बंगल्याच्या मागील दरवाज्यातून आत प्रवेश केला. स्वयंपाक गृहात सदर तरूणी काम करत असताना विक्रम याने तू माझ्यावर प्रेम का करत नाही, असे विचारणा केली. यावेळी तरूणीची लहान बहीण तेथे आली असता विक्रमने तिलाही मारहाण करत कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून त्या तरूणीवर रोखला असता तरूणीच्या आजीने विक्रम यास जोराचा धक्का दिल्याने कट्यातुन सुटलेली गोळी तरूणींच्या डोक्याला चाटून गेल्याने सुदैवाने ती तरूणी वाचली. मात्र, तरूणाने स्वतःच्या डोक्याला कट्टा लावत स्वतः वर गोळी झाडून घेतली.

यामधे तो तरूण गंभीर जखमी झाले असुन त्यास पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली तर फॉरेन्सिक लँब चे पथक ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट देत पुढील तपासाची चक्रे फीरवली आहे.