अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलंडला ३० हजारांचा टप्पा, ५०१ नव्या प्रकरणांची नोंद

अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०हजार १५ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ५०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून १० ते १२ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी करण्याची मागणी सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी करत होते.

अहमदनगर : अमदनगरमध्ये (Ahmednagar) कोरोनाने ( corona )  धूमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची (corona patients) संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, अकोले, श्रीगोंदा तालुक्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३० हजारांचा पलीकडे गेली आहे.

अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०हजार १५ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ५०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून १० ते १२ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी करण्याची मागणी सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी करत होते.

अहमदनगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. तसेच प्रशासनाची चिंताही वाढली आहे. गेल्या २४ तासात १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय तर आतापर्यंत एकूण ४६२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच एकूण २५ हजार ४३७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ४हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.