संगमनेरमध्ये १४ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर एकूण रूग्णसंख्या ३४६ वर

संगमनेर :  संगमनेर तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज शनिवारी १८ जुलै रोजी १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण रूग्णसंख्या ३४६ वर पोहोचली आहे. संगमनेरमधील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर शहर आणि तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत कोरोना रूग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच नागरिकांनी शासनाचे नियम व स्वयंशिस्त पाळावे असे आवाहन केले आहे.  संगमनेर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत एका ३४ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे, तसेच नाईकवाड पुरा येथील ६५ वर्षीय व्यक्तीला आणि वाघापूर गावातील ५२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यात आज शनिवारी पुन्हा ७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण १४ कोरोनाबाधित रूग्णांची नव्याने नोंद झाल्यामुळे, ही संख्या ३४६ वर पोहोचली आहे.