विखेंना रेमडेसिवीर वाटपाचा स्टंट भोवणार? श्रीरामपूरच्या डीवायएसपींकडून तपास सुरू

या व्हिडिओवरून सुजय विखे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेशानुसार शिर्डी विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी ते विमानतळावर दाखल झाले होते.

    कोरोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी खासगी संपर्काचा वापर करत काही राजकीय नेते रेमडेसिवीरचे वापर करताना दिसतायत. नुकतेच भाजप खासदार सुजय विखेंनी दिल्लीतून विमानाने रेमडेसिवीर आणून  मतदारसंघातील रुग्णालयांत त्यांचं वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

    या व्हिडिओवरून सुजय विखे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेशानुसार शिर्डी विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी ते विमानतळावर दाखल झाले होते. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी मिटकेंकडे हा तपास सोपवला आहे.

    महाराष्ट्रात सध्या कोरोनाने उच्छाद मांडला असून रुग्णांची संख्या वाढत चाललीय. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शनन्सचा तुटवडा जाणवत असून त्याचा काळाबाजार सुरू असल्याचं चित्रही पाहायला मिळतंय. भाजप खासदार सुजय विखे यांनी नुकतीच विमानानं इजेक्शन आणून त्याचं मतदारसंघात वाटप केल्याचा मुद्दा जोरदार गाजला.

    सुजय विखेंनी अशा प्रकारे इंजेक्शन्स आणणं आणि त्याचं वाटप करणं योग्य नसून ते सरकारकडे जमा करायला हवे होते, असं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं होतं.