पोलीसांवर संशय व्यक्त करणे दुर्दैवी, मंत्री हसन मुश्रीफ यांची फडणवीसांवर टीका

तसेच हसन मश्रीफ यांनी कोरोना उपाय योजनांनाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्या विषयीच्या सूचना केल्या तसेच पाशासनास कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोना संसर्गातून जास्तीत जास्त रुग्णांना बरे करणे हे आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर : राज्यात सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर राजकारणात वादंग सुरु आहे. या प्रकरणावर राजकारण देखील तापले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, ज्यांनी ५ वर्षे राज्याचं गृहखातं संभाळले त्यांना आता सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. तसेच भाजप सुशांत सिंग राजपूत प्रकरणात राजकाण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये झेंडावंदन दरम्यान ते बोलत होते. 