महिलांनो, Ahmednagar अंगणवाडीमध्ये लवकरच होणार भरती, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या सविस्तर

अहमदनगरच्या अंगणवाडीमध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाथची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महिलांना या पदभरतीमध्ये रोजगाराची मोठी साधी उपलब्ध होऊ शकणार आहे. अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका आणि मदतनीस अशा जागांसाठी ही भरती असणार आहे.

  अहमदनगर : अहमदनगरच्या अंगणवाडीमध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाथची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महिलांना या पदभरतीमध्ये रोजगाराची मोठी साधी उपलब्ध होऊ शकणार आहे. अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका आणि मदतनीस अशा जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 असणार आहे.

  कोणत्या पदांसाठी भरती

  अंगणवाडी सेविका

  मिनी सेविका

  मदतनीस

  या पदभरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच स्थानिक महिलांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघणं आवश्यक आहे.

  पाठवायचा पत्ता

  एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, पंचायत समिती पारनेर, तालुका पारनेर,  जिल्हा अहमदनगर. पिन – 414302

  अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख –  29 जुलै 2021