बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्या व एक करडू ठार  ; प्रिंप्री लौकी अजमपूर येथील घटना 

संगमनेर :  संगमनेर तालुक्यातील प्रिंप्री लौकी येथील तुकाराम लक्ष्मण गिते या शेतकर्‍याच्या बिबट्याने दोन  शेळ्या व एक बकरू जागीच ठार केले असून एक शेळी गंभीर जखमी केली आहे तर एका बकराला बिबट्याने  घेवून धूम ठोकली आहे  ही घटना मंगळवार दिनांक १२ जानेवारी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की प्रिंप्री लौकी अजमपूर गावा अंतर्गत असलेल्या गितेवस्ती येथे तुकाराम गिते हे शेतकरी राहात आहे त्यांनी नेहमी प्रमाणे सर्व शेळ्या घरा शेजारी असलेल्या गोठ्यात बांधल्या होत्या मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून शेळ्यांवर हल्ला केला आहे या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरू जागीच ठार केले असून एका  शेळीला गंभीर जखमी करत एका बकराला घेवून बिबट्याने धूम ठोकली आहे.

सकाळी गिते हे गोठ्याकडे गेले असता तर समोर त्यांना शेळ्या मृत अवस्थेत दिसून आल्या त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली वनपाल सुहास ऊपासनी, वनरक्षक एस .बी.सोणवने, वनमजूर श्री  चौधरी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे बिबट्याने तीन्ही शेळ्यांच्या नरडीला चावा घेतल्याचे दिसून आले यावेळी वनपाल सुहास ऊपासनी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की बिबट्याला जेरबंद करण्यासाठी  याठिकाणी आम्ही  पिंजरा लावणार आहे