महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार ; डोळासण उड्डाणपुलावरील घटना 

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथे उड्डाणपुल असून रविवारी पहाटे बिबट्या महामार्ग ओलांडण्याच्या नादात असताना त्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने तो जागीच ठार झाला. आजूबाजूच्या नागरिकांना समजताच नागरिकांनी या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती

    संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचा दोन वर्षीय  बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना रविवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली आहे त्यामुळे आता महामार्ग ओलांडण्याच्या नादात आणखीन किती बिबट्यांचे बळी जाणार आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

    याबाबत माहिती अशी की, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथे उड्डाणपुल असून रविवारी पहाटे बिबट्या महामार्ग ओलांडण्याच्या नादात असताना त्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने तो जागीच ठार झाला. आजूबाजूच्या नागरिकांना समजताच नागरिकांनी या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर काही जणांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. यांनतर वनविभागाचे वनरक्षक सी.डी.कासार,अरूण यादव यांनी घटनास्थळी धाव घेत त्या मृत बिबट्याला वाहणातून चंदनापूरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात आण्यात आले.

    दरम्यान यापूर्वीही डोळासणे शिवारात अशाच पद्धतीने महामार्ग ओलंडण्याच्या नादात बिबट्या ठार झाला होता चंदनापूरी घाट, डोळासणे, एकलघाट, आदि ठिकाणी महामार्गावर बिबट्यांचे जीव गेले आहे त्यामुळे महामार्ग ओलांडण्याच नादात आणखीन किती बिबट्यांना आपले जीव गमवावे लागणार आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.