संगमनेर शहरामध्ये नव्याने सुरु होणाऱ्या वाईन शॉपला स्थानिक नागरिकांचा विरोध

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील वाईन शॉपचे स्थलांतर होऊन ते संगमनेर शहरामध्ये स्थापित होणार आहे. होणार्‍या नवीन वाईन शॉपला स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे.

    अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील वाईन शॉपचे स्थलांतर होऊन ते संगमनेर शहरामध्ये स्थापित होणार आहे. होणार्‍या नवीन वाईन शॉपला स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. संगमनेर अकोले रोड वरील हॉटेल सेलिब्रेशन शेजारी नवीन वाईन शॉप सुरू होत आहे, त्यामुळे स्थानिक रहिवाशी राहणाऱ्या लोकांनी त्याला विरोध दर्शवला आहे.

    दरम्यान त्याविषयी माहिती देताना अहमदनगर जिल्हा दारूबंदी अध्यक्ष रंजना गवांदे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की नवीन जागेवर होणाऱ्या वाईन शॉपच्या पाठीमागच्या गल्लीत 50 फूट विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. तसेच शंभर फूट वरती मज्जित आहे व 100 मीटर भरती एज्युकेशन सोसायटीची विद्यालय आहेत शिवाय हा परिसर रहवाशी आहे. हा रहिवाशी असल्यामुळे नवीन वाईन शॉपच्या दुकानाला प्रचंड विरोध केला आहे.