अहमदनगरमधील ‘या’ तालुक्यात वाढतोय कोरोनाचा संसर्ग; २२ गावांत पुन्हा लाॅकडाउन

  पारनेर : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घटत असताना पारनेर तालुक्यात मात्र आलेख वाढत आहे. पारनेर तालुक्याने जिल्ह्याची चिंता वाढली असून जिल्हा प्रशासनाने तालुक्यात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. कोरोना बधीतांच्या संपर्कातील साडेसहाशे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तालुक्यातील २२ गावांमध्ये आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

  या गावात आहे लॉकडाउन

  निघोज, पठारवाडी, धोत्रे टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलंखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी सावरगाव, वाळवणे

  – आठ दिवस कडकडीत बंद
  – मेडिकल, भाजीपाला, दूध सेवा चालु
  – लग्न, वाढदिवस, उद्घाटनास पूर्व परवानगी आवश्यक

  रुग्ण सक्तीने कोविड केअर सेंटरला आणायचे आहेत. विनामास्क फिरणाऱ्या लोकांचे व चौकात पारावर विनाकारण बसणारे, फिरणारे यांचे फोटो काढुन त्यांचेवर १८८ अन्वये गुन्हे दाखल करणार. त्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोविड सुसंगत वर्तन नसलेस आता यापुढे समज न देता सरळ गुन्हे दाखल करणार आहोत.

  – ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर