रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार गजाआड, आता बाहेर येणार हत्येमागचं कारण

रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख संशयित बाळ बोठे हा पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता. त्याला अटक करण्याचे पोलिसांचे यापूर्वीचे काही प्रयत्न असफल झाले होते. बोठे फरार असल्याचं घोषित करत पोलिसांनी त्याला ९ एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. अखेर पोलिसांनी बोठेला हैदराबादमधून अटक केलीय. शनिवारी पहाटे पोलिसांना गुंगारा देण्याच्या तयारीत असलेल्या बोठेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

    गेल्या वर्षी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या प्रमुख रेखा जरे यांची हत्या झाल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचे धागेदोरे उलगडायला पोलिसांनी सुरुवात केली होती. मात्र या हत्याकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे हा फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला पकडले.

    रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख संशयित बाळ बोठे हा पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता. त्याला अटक करण्याचे पोलिसांचे यापूर्वीचे काही प्रयत्न असफल झाले होते. बोठे फरार असल्याचं घोषित करत पोलिसांनी त्याला ९ एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. अखेर पोलिसांनी बोठेला हैदराबादमधून अटक केलीय. शनिवारी पहाटे पोलिसांना गुंगारा देण्याच्या तयारीत असलेल्या बोठेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

    रेखा जरे यांची हत्या गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर या दिवशी करण्यात आली होती. नगर पुणे महामार्गावरील जाते फाटा या ठिकाणी दोघांनी त्यांची गळा चिरून हत्या केली होती. या हत्येची सुपारी बाळ बोठे यांनी दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी बोठेच्या अटकेची तयारी सुरू केली होती.

    रेखा भाऊसाहेब जरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. स्वतःच्या गाडीने त्या पुण्याहून अहमदनगरकडे चालल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि आईदेखील होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत या दुचाकीस्वारांनी जरे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

    त्यानंतर अहमदनगर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रं फिरवत मारेकऱ्यांना अटक केली होती. त्यांच्या जबानीतून हत्येची सुपारी देणाऱ्या बाळ बोठेचं नाव समोर आलं होतं.