मेसेजद्वारे हवामान अंदाज कळणाार; शेतकऱ्यांना दिलासा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विद्या विभागांतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाद्वारे आठवड्याच्या दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील तालुकानिहाय हवामान अंदाज व त्या आधारित कृषी सल्ला दिला जातो.

    नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विद्या विभागांतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाद्वारे आठवड्याच्या दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील तालुकानिहाय हवामान अंदाज व त्या आधारित कृषी सल्ला दिला जातो.

    गेल्या वर्षभरापासून हवामानाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी हवामान आधारित हा कृषी सल्ला व्हॉट्सअँपद्वारे देण्यात येतो, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाच्या कृषी विद्या विभागाने दिली आहे.

    सध्या दिल्या जात असलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामध्ये मागील सात दिवसांच्या हवामानाचे आकडेवारी दिली जाते. तसेच पुढील पाच दिवसांचा सविस्तर हवामानाचा अंदाज आणि हवामान आधारीत पीकनिहाय कृषी सल्ला देण्यात येतो. एम किसान या ऐपद्वारे सुमारे 5 लाख लोकांना टेक्स्ट मेसेज मिळत आहेत व व्हॉट्सअॅपद्वारे सात हजार लोक यास जोडले गेलेले आहेत, अशी माहिती विभागाने दिली.