सैन्य अधिकाऱ्यांचा वेष धारण करून दोघांचा प्रशिक्षण केंद्रामध्ये घुसखोरीचा प्रयत्न, पोलिसांनी केली अटक

सैन्य अधिकाऱ्यांचा (Military Intelligence) वेष धारण (impersonated as army officers) करून लष्कराच्या बनावट आयडीसह (fake ID) अहमदनगरच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये घोसखोरी करण्याच्या प्रयत्नात दोन जणांना (nabbed two people ) आज गुरूवारी अटक करण्यात आली आहे.

सैन्य अधिकाऱ्यांचा (Military Intelligence) वेष धारण (impersonated as army officers) करून लष्कराच्या बनावट आयडीसह (fake ID) अहमदनगरच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये घोसखोरी करण्याच्या प्रयत्नात दोन जणांना (nabbed two people ) आज गुरूवारी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांना गुप्तचर अधिकाऱ्यांनी पडकले आहेत. तसेच अहमदनगर पोलिसांनी दोघांवर कलम ४२०, १७० आणि २४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान पाटील आणि तुषार पाटील असे या घुसखोरी करणाऱ्या तोतय़ांची नावे आहेत. तसेच हे दोघे आरोपी धुळे जिल्हा येथील रहिवासी आहेत. प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य गेटवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना हे दोघेही संशयित असल्याचे आढळले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या बनावट ओळखपत्राची तपासणी केली. तसेच ही ओळखपत्रे कोठे बनवली याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, अहमदनगर पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलमानुसार ४२०, १७० आणि २४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास अद्यापही सुरू आहे.