कोविडसेंटरमधील रुग्णांसोबत आमदार रोहित पवार थिरकले ‘झिंगाट’ गाण्यावर ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

कोविड सेंटरमधील रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी उपस्थित रुग्णांच्या सोबत सहभागी होता स्वतः रोहित पवारही सैराटमधील झिंगाट गाण्यावर थिरकले.

    कर्जत: कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे कायम आपल्या कामाच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. नुकतीच रोहित पवारांनी व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी रुग्णांशी त्यांनी संवाद साधता धीर दिला.

    कोविड सेंटरमधील रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी उपस्थित रुग्णांच्या सोबत सहभागी होता स्वतः रोहित पवारही सैराटमधील झिंगाट गाण्यावर थिरकले. त्यांच्या थिरकण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हारायराळ झाला आहे.