ग्रामपंचायतच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये  पोलिसांचे मॉक ड्रिल

अनुचित घटना घडल्यास त्यास प्रतिबंध करता येईल व तेथे जमलेला जमाव कसा पांगावात येईल. त्यावर कसे नियंत्रण करता येईल याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

 

कर्जत: कर्जत ग्रामपंचायत निवडणूक २०२१ अनुषंगाने पोलिस यंत्रणा व इतर यंत्रणा किती सतर्क आहेत याबाबत खात्री करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आली.सदर मॉक ड्रिल ही बसस्थानकामध्ये घेण्यात आली. एखादी घटना घडल्यास त्या घटना ठिकाणी किती वेळात कर्जत पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हजर होतात. तसेच कर्जत तहसीलदार, श्रीगोंदा व जामखेड पोलिस स्टेशन येथील कर्मचारी यांना येण्यास किती वेळ लागतो.
अनुचित घटना घडल्यास त्यास प्रतिबंध करता येईल व तेथे जमलेला जमाव कसा पांगावात येईल. त्यावर कसे नियंत्रण करता येईल याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर मॉक ड्रिल करिता पोलीस निरीक्षक  चंद्रशेखर यादव, कर्जत पोलीस स्टेशन, ४ पोलीस अधिकारी व ३६ पोलीस कर्मचारी व होमगार्ड हजर होते.
तसेच जामखेड आणि श्रीगोंदा येथील पोलीस अधिकारी आणि जवान हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले..