मुळा धरण भरले ४४ टक्के

    अहमदनगर : मुळा धरण पाण्याचा साठा ११ हजार ३८६ दशलक्ष घनफूट झाला आहे. धरणाकडे १० हजार ३४२ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरण ११३८६ म्हणजे ४४ टक्के भरले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे.

    गुरुवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.

    ‘मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरण असून, मुळा धरण 44 टक्के भरले आहे. कोतुळ येथे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे’.

    – अण्णासाहेब आंधळे, धरण शाखा अभियंता