लोणीमध्ये तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

अर्जुन पवार याच्या डोक्यात दगड घालून केला आहे. खून करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असूनवरील आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास लोणी पोलिस स्टेशनचे एपीआय समाधान पाटील करत आहेत.

    शिर्डी : राहाता तालुक्यातील लोणी मध्ये इरिगेशन बंगला परिसरामध्ये कॅनॉलच्या शेजारी कच्च्यारोडवर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. सदर घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली असता सदरचा मृतदेह हा अर्जुन अनिल पवार, वय २५ रा. बारागाव नांदूर ता. राहुरी येथील असल्याचे निष्पन्न झाले. हा खून त्याचे मित्र दीपक डोळस व विठ्ठल कावळे यांनी केल्याचे उघड आले असून सदर खून हा वरील आरोपींनी अर्जुन पवार याच्या डोक्यात दगड घालून केला आहे. खून करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असूनवरील आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास लोणी पोलिस स्टेशनचे एपीआय समाधान पाटील करत आहेत. या घटनेने लोणी परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या तीन तासात कुठलाही पुरावा नसताना गुन्ह्याचा तपास करण्यात लोणी पोलीस स्टेशनला यश आले .