नगर तालुका दूध संघाच्या पदाधिकारी,अधिकाऱ्यांनी सरकाराला घातला लाखोंचा गंडा; 20 जणांवर गुन्हे दाखल

नगर तालुका दूध संघ एमआयडीसी येथे तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी खोटे लेखे तयार करून, दस्तावेजात खोटय़ा नोंदी करून, कर चुकवून शासनाची फसवणूक केली. या संदर्भात अनेक वेळेला तक्रारी करून या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी करण्यात आली होती. लेखापरीक्षणामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन खोटे दस्त बनविल्याचे उघड झाले होते तसेच अधिकाऱ्यांनी त्याला साथ दिल्याचेही उघड झाले.

    अहमदनगर : नगर तालुका दूध संघ एमआयडीसी येथे कार्यरत असलेले पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी खोटे दस्तावेज तयार करून शासनाची आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वीसजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी नारायण गाधेकर यांनी फिर्याद दिली होती.

    नगर तालुका दूध संघ एमआयडीसी येथे तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी खोटे लेखे तयार करून, दस्तावेजात खोटय़ा नोंदी करून, कर चुकवून शासनाची फसवणूक केली. या संदर्भात अनेक वेळेला तक्रारी करून या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी करण्यात आली होती. लेखापरीक्षणामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन खोटे दस्त बनविल्याचे उघड झाले होते तसेच अधिकाऱ्यांनी त्याला साथ दिल्याचेही उघड झाले.

    तसेच, फसवणुकीच्या व लुबाडणुकीच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांच्या, प्रशासक व अवसायक यांच्या देय असलेल्या रकमा हिशेबातून काढून निरंक करून गैरव्यवहार केला. संघाच्या पदाधिकाऱयांनी ते अध्यक्ष असलेल्या संस्थांच्या नावाने या संघातून ऍडव्हान्सच्या नावाखाली निधीचा गैरव्यवहार केला व शासनाची फसवणूक करून 8 कोटी 52 लाख 68 हजार 028 रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. फिर्यादीवरून फसवणुकीचा व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.