नगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र, शिवसेनेला मोठा धक्का

महापालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडणुकीत चक्क राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान उमेदवारांना अर्ज वितरण करून दाखल केले. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता निवडणूक विशेष सभा झाली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी, भाजपमध्ये सामना रंगला आहे.

अहमदनगर: राज्यातील कोरोनाची परिस्थिती (corona virus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) रखडलेली अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीला (NCP and BJP together in municipal elections) अखेर मुहूर्त लागला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही निवड प्रक्रिया लॉकडाउनमुळे रखडली होती. अखेर ऑनलाईनद्वारे ही निवड प्रक्रिया आज पार पडणार आहे.

परंतु मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडणुकीत चक्क राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान उमेदवारांना अर्ज वितरण करून दाखल केले. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता निवडणूक विशेष सभा झाली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी, भाजपमध्ये सामना रंगला आहे.

भाजप नगरसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेत भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता आली. संख्याबळ जास्त असतानाही शिवसेना सत्तेपासून दूरच आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र, अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले.