ही तर शिवसेनेची भूमिका, सरकारची नाही, नामांतराबाबत राष्ट्रवादीने दिलं असं उत्तर…

नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधील दरी वाढत चालल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येताना दिसतंय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीने नामांतराला असलेला आपला विरोध अधिक ठळकपणे समोर आणलाय. नामांतराची भूमिका ही शिवसेनेची असून ती सरकारची आहे असे म्हणणे सध्या तरी योग्य होणार नाही, असं नुकतंच प्रफुल्ल पटेल यंनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय.

औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करणे ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. शिवसेना सध्या सरकारमध्ये असली, तरी सरकार तीन पक्षांचं आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या समन्वय समितीत जोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय होत नाही, तोपर्यंत नामांतराची भूमिका ही केवळ शिवसेनेची आहे, सरकारची नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्पष्ट कऱण्यात आलंय.

नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधील दरी वाढत चालल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येताना दिसतंय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीने नामांतराला असलेला आपला विरोध अधिक ठळकपणे समोर आणलाय. नामांतराची भूमिका ही शिवसेनेची असून ती सरकारची आहे असे म्हणणे सध्या तरी योग्य होणार नाही, असं नुकतंच प्रफुल्ल पटेल यंनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय.

औरंगाबादऐवजी संभाजीनगर आणि उस्मानाबादऐवजी धाराशिव या नावांसाठी शिवसेना आग्रही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना नेते आणि शिवसैनिक सार्वजनिक आयुष्यात याच नावांचा वापर करताना दिसतात. त्यामुळे आता शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असल्याने कागदोपत्री ही नावे बदलण्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय. मात्र किमान समान कार्यक्रमात याचा समावेश नसल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ही भूमिका मान्य नसल्यामुळे सध्या काहीशी तणावाची स्थिती निर्माण झालीय.

याबाबत आता नव्या मित्रपक्षांची समजूत काढण्यात शिवसेनेला यश येतं का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. समन्वय समितीच्या बैठकीत हा विषय आल्यानंतर त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.