“थोडं टुक जरी वाजलं तरी मोठा ब्लास्ट झाल्यासारखं भाजप दाखवतं” – रोहित पवार

“आमच्या तिनही पक्षांमध्ये एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे आमच्यात संवाद आहे. ज्या ठिकाणी संवाद असतो त्या ठिकाणी काही प्रमाणात वादही असतो. आणि जिथे संवाद नसतो तिथे फक्त हेकेखोरपणा आणि अहंकार असतो." असं म्हणत त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

    हे सरकार तीन राजकीय पक्षांचं असल्याने व या तिनही पक्षांमध्ये विसंवाद असल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही. अशी टीका नेहमीच विरोधी पक्षाकडून होत असते. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी “राज्यातील विरोधी पक्ष हा मीडिया आणि सोशल मीडिच्या माध्यमातून थोडं जरी टुक वाजलं तरी मोठा बॉम्ब ब्लास्ट झाल्यासारखं भासवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो.” असं मत व्यक्त केलं आहे.

    पाथर्डीचे वकील प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसानिमीत्त पाथर्डी तालुक्यातील covid-19 योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

    “आमच्या तिनही पक्षांमध्ये एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे आमच्यात संवाद आहे. ज्या ठिकाणी संवाद असतो त्या ठिकाणी काही प्रमाणात वादही असतो. आणि जिथे संवाद नसतो तिथे फक्त हेकेखोरपणा आणि अहंकार असतो. आमच्या तीनही पक्षात संवाद आहे आणि हा संवाद होत असताना कुठे ना कुठे वाद हा होतच असतो. आणि संवादातूनच मार्ग सुटत असतात.”

    “विरोधकांची अडचण एवढीच आहे की, तीन पक्ष सत्तेत आल्यामुळे हा देशापुढे फार मोठा संदेश आहे. आणि याचीच आता भाजपला भीती वाटू लागली आहे. या भीतीमुळेच मीडिया, सोशल मिडियाचा वापर करून थोडं जरी टुक वाजलं तरी मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला की काय असा भासवण्याचा प्रयत्न भाजपचकडून केला जातो.” असं म्हणत रोहित पवार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.