इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा रास्तारोको

    नेवासा : पेट्रोल-डिझेल व गॅस इंधन दरवाढीला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नेवासा-शेवगाव रस्त्यावर असलेल्या भेंडा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या नेतृत्वाखाली हा रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

    यावेळी अभंग, ज्ञानेश्वरचे संचालक देसाई देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, शहराध्यक्ष गफूरभाई भगवान, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोकराव ढगे, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत, शंकरराव भारस्कर, रज्जाक इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका वक्त्यांनी केली.

    नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजीराव शिंदे, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे, प्रा. नारायण म्हस्के, शिवाजीराव कोलते, तुकाराम मिसाळ, अशोकराव मिसाळ, अमोल अभंग, जनार्दन कदम, अशोक वायकर, सोपान महापूर, हरिभाऊ नवले, रामकृष्ण नवले, बलभीम फुलारी, कचरू यादव,गुलाबराव आढागळे, अशोकराव उगले, बाळासाहेब आरगडे, सुभाष चौधरी, मनोज हुलजुते, सोमनाथ कचरे, प्रसाद खराडे, राजेंद्र चाबुकस्वार, अभिजित ससाणे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

    तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, मंडल अधिकारी आय्यप्पा फुलमाळी, तलाठी विजय जाधव यावेळी उपस्थित होते.