शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत आज दुपटीने वाढ

    नगर तालुका : नगर शहरात आज कोरोना रूग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. शहरात दररोज सरासरी 30 च्या आसपास कोरोनाबाधित आढळून येतात. मात्र, आज ही संख्या 64 झाली आहे. वाढलेली ही संख्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर चिंताजनक आहे.

    गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागाच्या तुलनेत नगर शहरात दिलासादायक स्थिती आहे. मागील काही दिवसांत शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 50 च्या पुढे गेली नव्हती. आज ती 64 झाली आहे. जिल्ह्यात 783 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात जिल्हा रूग्णालयातील लॅबमध्ये 175, खासगी प्रयोग शाळेत 336, अँटीजेन चाचणीत 272 रूग्णांचा समावेश आहे.

    संगमनेर तालुक्यात आजही कोरोनाचा वाढता आलेख राहिला आहे. राहुरी, अकोले व पारनेर या तालुक्यांची बाधित रूग्णांची संख्या 60 च्या पुढे आहे.

    तालुकानिहाय बाधितांची संख्या अशी- संगमनेर 156, राहुरी 81, अकोले 78, पारनेर 65, नगर शहर 64, राहाता 46, नेवासा 43, पाथर्डी 42, कर्जत 41, श्रीगोंदा 34, कोपरगाव 33, शेवगाव 28, नगर तालुका 27, श्रीरामपूर 23, जामखेड 12, इतर जिल्हा 9, मिलिटरी हॉस्पिटल 1.