मोरयाचिंचोरेत महिलादिनी २५१ महिलांच्या हस्ते एक हजार वृक्षांचे वृक्षारोपण

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे सार्वजनिक जीवनात कायम दुय्यम स्थानावर राहिलेल्या महिलांना गावच्या विकासात व प्रत्येक उपक्रमात सक्रिय संधी देत सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातही संधी उपलब्ध करून दिली.

  नेवासा : सर्वत्र गावात नव्हे तर देशातच महिलांना फक्त आरक्षणाचे नुसार गावच्या कारभारात संधी मिळते मात्र सर्व कारभार त्यांचे पतीदेव किंवा सासरे, दिर, किंवा मुलं हेच सांभाळतात आणि सभा, समारंभात ही तेच मिरवतात. मात्र महाराष्ट्रात एक आगळंवेगळं गाव आहे.ते गाव आहे नेवासे तालुक्यातील आदर्श गाव मोरयाचिंचोरे. या गावाला हे वेगळेपण दिले यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या व माध्यमातून विकासासाठी मोरयाचिंचोरे हे गाव दत्तक घेऊन शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या गावचा सर्वांगीण विकास करत आहे.पुरुषप्रधान संस्कृतीमुळे सार्वजनिक जीवनात कायम दुय्यम स्थानावर राहिलेल्या महिलांना गावच्या विकासात व प्रत्येक उपक्रमात सक्रिय संधी देत सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातही संधी उपलब्ध करून दिली.

  दरम्यान दि ८ मार्च २०२१ रोजी जागतिक रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे माध्यमातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथे वृक्षारोपन उपक्रमात शेतमजूर , डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, प्राध्यापक, शिक्षिका आशा विविध क्षेत्रातील 251 महिलांनी वृक्ष दिंडी काढत कडुनिंब,जांभूळ,चिंच,वड,पिंपळ आदी एक हजार वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले.
  वृक्षारोपनानंतर महिला भगिनींना स्नेहभोजन करत यशवंत वाचनालयातील पुस्तकांचे वृक्षांच्या सानिध्यात वाचन केले व वृक्ष संगोपन व नियमित वाचनाचा संकल्प केला.

  जागतिक महिला दिनानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे वतीने प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून आदर्श गाव मोरयाचिंचोरे येथे महिलांच्या हस्ते वृक्षारोपन करून नारी शक्तीचा गौरव केला. आम्ही वृक्षारोपन केलेल्या वृक्षांना भाऊ मानून त्याचे जतन करणार आहोत.

  - सुमन बाळासाहेब मोरे, अध्यक्ष, प्रगती महिला बचत गट मोरयाचिंचोरे, ता. नेवासे

  “प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शगाव मोरयाचिंचोरेत ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच, वाचनालय, तंटामुक्ती, शाळा , वन व्यवस्थापन , आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, आदी समित्यांवर महिलाच कामकाज पहातात. तसेच गावातील विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पन, ध्वजारोहनासह विविध धार्मिक, सामाजिक कार्यासाठी महिलांचा मान दिला जातो. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवस आदर्श गाव मोरया चिंचोरेत महिलादिनी कृतीतूनच साजरा केला जातो.”
  – जयश्री राजेंद्र मंचरे , सरपंच, ग्रामपंचायत मोरयाचिंचोरे