Eknath Khadase

शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांना आज नगरमध्ये खडसे शिवसेनेत प्रवेश करतील का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना खोतकर म्हणाले की, हा निर्णय सर्वस्वी एकनाथ खडसेंचा आहे. आपण किती काही म्हणाले तरी निर्णय त्यांना घ्यायचा आहे. असे स्पष्ट वक्तव्य खोतकरांनी केले आहे.

अहमदनगर : भाजपावर (BJP) नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी (NCP) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ चालली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपवर मागील काही महिन्यांपासून नाराज आहेत. ते आता पक्षाला सोडण्याच्या भूमिकेतच आहेत. आता फक्त मुहूर्त ठरायचा आहे. इकडे का तिकडे कुठे जायचे, असे म्हणत शिवसेना (Shivsena) नेते माजी मंत्री अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी राजकीय वातारवरणातील सस्पेंन्स वाढवला आहे.

शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांना आज नगरमध्ये खडसे शिवसेनेत प्रवेश करतील का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना खोतकर म्हणाले की, हा निर्णय सर्वस्वी एकनाथ खडसेंचा आहे. आपण किती काही म्हणाले तरी निर्णय त्यांना घ्यायचा आहे. असे स्पष्ट वक्तव्य खोतकरांनी केले आहे.

खोतकरांना एकनाथ खडसे भाजपाला रामराम करतील का असा प्रश्न विचारण्यात आला यावर ते उत्तर देत म्हणाले की, खडसेंचे आता भाजपात काय राहिले आहे? जवळपास खडसे भाजपातून बाजूलाच झाले आहेत. त्यांना चांगले वाईट समजते. म्हणून ते योग्य पक्षातच जातील असे खोतकर म्हणाले आहेत. त्यामुळे खडसे काय मोठा निर्णय घेणार याकडे साऱ्या राजकीय नेत्यांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.