onion

    अहमदनगर : स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यामधील वाराई हमाली संदर्भात चर्चा करूनही वाद न मिटल्याने शनिवारपासून (दि. 4) पुढील निर्णय होईपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवणार असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी कळविले.

    तसेच शेतकऱ्यांनी आपला कांदा नेप्ती उपबाजार समिती येथे विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे. माल वाहतूकदार आणि कांदा खरेदीदार यांच्यामधील वादात शेतकऱ्यांचा कांदा लिलाव होणार नाही. हा वाद कधी मिटणार आणि कांदा लिलाव कधी पूर्ववत सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.