शुक्रवारी पवित्र हजरत बालचे ऑनलाइन दर्शन

अहमदनगर: मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद मिलादुन्नबी (झेंडा ईद) म्हणून शुक्रवारी (दि. ३०) रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस (हजरत बाल) भाविकांच्या दर्शनासाठी ऑनलाइनद्वारे खुले करण्यात येणार आहे.

मीर मुर्तजा तकटी दरवाजा महल येथील सर्व धार्मिक उत्सव रद्द
अहमदनगर: मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद मिलादुन्नबी (झेंडा ईद) म्हणून शुक्रवारी (दि. ३०) रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस (हजरत बाल) भाविकांच्या दर्शनासाठी ऑनलाइनद्वारे खुले करण्यात येणार आहे. नगरला परंपरेनुसार दरवर्षी फक्त हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनीच पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येतात.यावर्षी नागरिकांना ऑनलाइन दर्शनची सोय करण्यात आली असून,भाविकांना घरी थांबूनच आय लव्ह नगर या अ‍ॅपवर व फेसबुक पेजवर लाईव्ह हजरतबलचे दर्शन घ्यावे.यावर्षी इतर धार्मिक उत्सव रद्द करण्यात आले असल्याची माहिती पुजारी सय्यद बुर्‍हाण कादरी चिश्ती यांनी दिली.