कर्जत येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

कर्जत : ग्रॅज्युएट फौंडेशन कर्जत व स्वप्नपूर्ती युवा ग्रामविकास प्रतिष्ठान राशीन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

 कर्जत :  ग्रॅज्युएट फौंडेशन कर्जत व स्वप्नपूर्ती युवा ग्रामविकास प्रतिष्ठान राशीन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन कर्जतच्या प्रांतधिकारी अर्चना नष्टे, पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव व कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेविका मनिषा सोनमाळी, नगरसेवक सचिन घुले, ओंकार तोटे , आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, राशीनचे माजी सरपंच राम साळवे, सचिन सोनमाळी, सागर कांबळे, गणेश शिंदे, सतिष पाटील, अतुल शिंदे, अविनाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबीराचे आयोजन आकाश कटके, अजित तोरडमल, अक्षय कारंडे व अमर साळवे यांनी केले होते. तसेच प्रत्येक रक्तदात्यांना मास्क, सॅनिटायजर व कोरोना प्रतिबंधक अर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आकाश कटके यांनी दिली.
रक्त संकलन करण्यासाठी सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड बॅंकेचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात ७० युवकांनी रक्तदान केले.