निळवंडे धरणातून शेतीसाठी उन्हाळ्यातील पहिले आवर्तन सोडले
निळवंडे धरणातून शेतीसाठी उन्हाळ्यातील पहिले आवर्तन सोडले

आज दुपारी १५०० क्युसेकने पाणी निळवंडे धरणातून प्रवरा पाञात सोडण्यात आले आहे. जवळपास आठ दिवसात ही बंधारे भरल्यानंतर या आवर्तनाला जोडून उन्हाळ हंगामातील शेतीचे पहीले आवर्तन सोडण्यात येणार आहे त्यामुळे हे आवर्तन जवळपास २८ ते ३० दिवस सुरु राहणार असुन या आवर्तनात अंदाजे साडे तिन टी.एम.सी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे

    अकोले : प्रवरा नदिपाञातील के.टी.वेअर ( बंधारे ) भरण्यासाठी व त्याला जोडूनच उन्हाळा हंगामातील पहिले शेतीचे आवर्तन आज गुरूवारी दुपारी १५०० क्युसेकने निळवंडे धरणातून सोडण्यात आले.

    जलसंपदा विभाग भंडारदराचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारदरा- निळवंडे धरणाचे लाभक्षेञातील नेवासे पर्यत प्रवरा नदिपाञावरील अनेक बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होती.  त्यानुसार आज दुपारी १५०० क्युसेकने पाणी निळवंडे धरणातून प्रवरा पाञात सोडण्यात आले आहे. जवळपास आठ दिवसात ही बंधारे भरल्यानंतर या आवर्तनाला जोडून उन्हाळ हंगामातील शेतीचे पहीले आवर्तन सोडण्यात येणार आहे त्यामुळे हे आवर्तन जवळपास २८ ते ३० दिवस सुरु राहणार असुन या आवर्तनात अंदाजे साडे तिन टी.एम.सी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.तर पाणी सोडतेवेळी निळवंडे धरणाचा पाणी साठा ५८७९ द.ल.घ.फु.आहे.