अहमदनगर | नगरपालिका निवडणुकांची तयारी; प्रभाग रचनेचा कार्यक्रम लवकरच हाेणार जाहीर | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
अहमदनगर
Published: Aug 25, 2021 08:24 PM

अहमदनगरनगरपालिका निवडणुकांची तयारी; प्रभाग रचनेचा कार्यक्रम लवकरच हाेणार जाहीर

Navarashtra News Network
संदीप रोडे
प्रतिनिधी, अहमदनगर
नगरपालिका निवडणुकांची तयारी; प्रभाग रचनेचा कार्यक्रम लवकरच हाेणार जाहीर

प्रशासनाकडून नगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने इच्छुकांचीही लगबग सुरू झाली आहे.

  अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मुदत संपलेल्या व संपणाऱ्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार असून त्यासाठी २०११ च्या जणगणनेनुसार प्रगणक गट तयार करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून नगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने इच्छुकांचीही लगबग सुरू झाली आहे.
  श्रीरामपूर, संगमनेर, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शिर्डी, राहाताची डिसेंबरमध्ये तर कोपरगाव, राहुरी नोव्हेंबरमध्ये आणि नेवाशाची मार्च २०२२ मध्ये मुदत संपणार आहे. प्रभाग रचनेची पूर्वतयारी म्हणून २०११ च्या जणगणनेनुसार प्रगणक गट तयार करण्यात येत आहेत.

  या पालिकांच्या गत पंचवार्षिकच्या निवडणुका या द्विसदस्यीय पध्दतीने झाल्या होत्या. आगामी निवडणुका मात्र आता एक सदस्यीय पध्दतीने होणार आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.

  आदेशाकडे सगळ्यांचे लक्ष

  जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर, शेवगाव, जामखेड या पाच पालिकांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. प्रारूप मतदार यादीही जाहीर झालेली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे निवडणुक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. आता या पालिकांच्या निवडणुकीसंदर्भात काय आदेश निघणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  १८ शनिवार
  शनिवार, सप्टेंबर १८, २०२१

  येडीयुरप्पा यांनी कर्नाटक यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला पळता भुई थोडी होईल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.