लोणीत कोरोना टेस्ट लॅब तयार

शिर्डी : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संशयितांची टेस्ट पुणे येथे करण्यात येते.

 शिर्डी : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संशयितांची टेस्ट पुणे येथे करण्यात येते. मात्र लोणीच्या प्रवरा अभिमत विद्यापीठ आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने सहा दिवसात कोविड १९ चे शंभर बेड रुग्णालय  उभारल्यानंतर आता कोरोना टेस्ट लॅब सुद्धा उभी केली आहे. या लॅब मध्ये एकाच वेळी  ४ नमुने तपासले जाणार असून चोवीस तासात १२० तपासले जातील. शासनाची मान्यता मिळताच हि लॅब सुरु होणार असून त्याचा नगर जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे.शनिवारी या लॅबच्या मशीनचे प्रशिक्षण सुरु करण्यात आल्याची माहिती डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.