भाविकांच्या श्रद्धेला प्राधान्य; भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारला शिर्डीचा पदभार

शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य सरकारने सोमवारी भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची नियुक्ती केली आहे.

    शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य सरकारने सोमवारी भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची नियुक्ती केली आहे. साई संस्थानचे पाचवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बानाईत-धिवरे यांनी आज पोळा सणाच्या मुहूर्तावर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहेत. भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची नागपुर येथील बानाईत रेशीम उद्योग विभागाच्या संचालक या पदावरून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज पदभार स्वीकारला आहे. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना साई दर्शन व्यवस्थित तसेच जास्तीत जास्त सेवा व सुविधा कशा देता येतील याकडे माझे विशेष लक्ष असणार असल्याचे यावेळी बानाईत-धिवरे म्हणाल्या आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. शासनाचे आदेश आलेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर भाविकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नय यासाठी याचा पूर्ण अभ्यास करून येणाऱ्या भाविकांना साई दर्शन त्याचबरोबर, निवास, भोजन आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. या कोरोनाचा महामारी काळात साई संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पीटल व श्री साईनाथ रूग्णालयामध्ये जास्तीत जास्त रूग्णांना सुलभ पध्दतीने सेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

    संस्थानचा सर्व कारभार यापूर्वी प्रमाणेच सुव्यवस्थितपणे सुरू राहील यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर संस्थानचे सुरू असलेले प्रकल्प व नियोजीत प्रकल्प याचा पूर्ण अभ्यास करून लवकरात लवकर पूर्ण करण्याकरीता प्रयत्न करणार असून, श्री साईबाबांचे जीवनचरित्र व शिकवण याचा प्रचार प्रसार करण्याकरीता नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याच यावेळी भाग्यश्री बानाईत-धिवरे म्हणाल्या.